Ad will apear here
Next
नागपुरात उद्यापासून अभिनय कार्यशाळा
नागपुरात उद्यापासून अभिनय कार्यशाळानागपूर : राष्ट्रभाषा परिवार व मेराकी थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसांच्या अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, २५ मेपासून आठ जूनपर्यंत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शहरातील युवकांना नाट्य क्षेत्रातील विविध पैलूंची ओळख करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनय कार्यशाळेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत.

या कार्यशाळेमध्ये दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे स्नातक अशोक धरमसोत व मंगल सानप मार्गदर्शन करणार आहेत. अशोक धरमसोत हे अभिनय आणि नाट्यक्षेत्रामध्ये दहा वर्षांपासून काम करत आहेत. तसेच त्यांनी विविध देशांत नाट्य सादरीकरण केले आहे. मंगल सानप यांनी ‘रिअॅलिस्टिक अॅक्टिंग टेक्निक्स’चे प्रशिक्षण घेतले आहे.
‘या कार्यशाळेमध्ये अभिनय हा मूळ बिंदू नसून, त्यात संगीत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजनेबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ही कार्यशाळा ‘प्रोडक्शन ओरिएंटेड’ असून, कार्यशाळेच्या अंतिम दिवशी नाट्यसादरीकरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रभाषा परिवाराकडून देण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क :
रूपेश पवार : ९५११६ ७३३०१ , ९५०५१ ६३१
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZAWBC
Similar Posts
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले
जीएसटी जनजागृतीसाठी ‘एक्झॅक्ट’ मुंबई : एक्सेलॉन सॉफ्टवेअरचे निर्माता असलेले एक्झॅक्ट हे भारतातील अग्रगण्य जीएसटी सोल्यूशन आणि जीओआय परवानाप्राप्त जीएसपी (जीएसटी सुविधा पुरवठादार) आहेत. नवीन जीएसटी प्रणाली व्यवसायांसाठी सुसह्य असावी, या उद्देशाने बुधवारी, तीन मे रोजी जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जीएसटी अंमलबजावणीबाबत ग्राहक,
डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सव नागपूर : येथील डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सव क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात तुळशीराम गायकवाड पाटील कॉलेजने दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने केवळ सात धावांनी विजय संपादन केला. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने वसंतनगरच्या मैदानावर करण्यात आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language